Skip to main content

शोध राजीव हत्येचा भाग-२


                    21 मे 1991 रात्री 10.30 वाजता दिल्ली पोलिस मुख्यालयातील फोन खणाणला. त्याची घंटा नेहमीपेक्षा बेसुर वाजत होती. एखाद्या विदारक घटनेची चाहुलच जणू ती. शिपायाने फोन उचलताच  त्याच्या पायाखालची जमीन सरकली, हात पाय गारठले, त्याच्या चेहऱ्याचा नूरच पालटला. मजकूर होता 10 मिनिटांपूर्वी झालेली राजीव हत्या.
                    घटना वाऱ्यासारखी देशभर पसरली. कोणाचाही या घटनेवर विश्वास बसत नव्हता. अजुन कोणत्याही प्रसार माध्यमातून अधिकृत माहिती मिळाली नव्हती. तरीसुद्धा देशात शोकाकूल वातावरण तयार झाले होते. जो नाही तो एकमेकांशीच बोलुन खातरजमा करून घेत होता.
                    इकडे घटनास्थळाचे दृष्य इतके विदारक होते की, हे राजीव गांधीचे पार्थिव आहे, असे सांगूनही  कोणाला विश्वास न वाटावा. एक महिला संपूर्ण जळालेल्या , विषण्ण अवस्थेत घटनास्थळी मृत्युमुखी पडलेली होती. तिचा या घटनेशी जवळचा संबंध असावा एवढाच अंदाज स्थानिक पोलिस घटनास्थळाच्या पाहणीनंतर लावू शकले. चाचणीसाठी आवश्यक असलेले नमुने गोळा करून प्रयोगशाळेत धाडले. हत्येच्या दोन दिवसानंतर वर्तमानपत्रामध्ये संशयितांची छायाचित्र छापून आली. त्यात पंजाबी ड्रेस (गजरा घातलेली ) आणि साडी घातलेल्या दोन स्त्रिया, पांढरा सदरा व पायजामा घातलेला पुरुष हे होते. छायाचित्रांचा स्त्रोत होता पेरुम्बदुरचे प्रसिद्ध छायाचित्रकार हरिबाबुंचा कँमेरा. यावरून हरिबाबू सुद्धा कटात शामिल असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
शालेय गण वेशातील कोकीळावाणी, पंजाबी ड्रेस मधील मानवी बॉम्ब,साडीतील अनोळखी स्त्री व कटाचा  मुख्य सुत्रधार  शिवरासन.
                  घटनेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 22 मे 1991 आई - बाबांना चांगलाच आठवतो कारण त्या दिवशी त्यांचे लग्न झाले. त्यांच्या माहितीनुसार सर्व जनतेने आपल्या लाडक्या नेत्याच्या हत्येच्या निषेधार्थ बंद पुकारला होता. वाहतुक सेवा, बाजारपेठा, शाळा, सर्व शासकीय कार्यालये ओसाड पडली होती. आजकाल लोक आपल्या मुलांचे वाढदिवसही जश्नात साजरे करतात, एवढे छोटेखानी लग्न आई - बाबांना उरकावे लागले होते. गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकच चर्चा चालू होती, राजीव हत्या का झाली ? आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेची दखल गांभीर्याने घेतली होती. या सर्व घटनेचा दबाव पोलिस खात्यावर वाढत होता. जनक्षोभ उसळू नये आणि हिंसाचार घडू नये यासाठी हे प्रकरण उच्च पातळीवर व तत्पर हाताळायचे ठरले. पोलिस मुख्यालयात बैठक बसली. बैठकीत विशेष दल स्थापण्यात आले. तपास प्रमुख म्हणून कार्तिकेयन एकमुखाने निवडले गेले. त्यांना सर्व अधिकार बहाल करण्यात आले. 
स्फोटानंतर विषण्ण अवस्थेत पडलेली पंजाबी ड्रेस घातलेली स्त्री

                    विशेष तपास दलाने घटना स्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांनाही विशेष धागेदोरे सापडले नाहीत. संशयित म्हणाव्या अशा फक्त कँमेरा, छर्रे, ओळख न पटणारी 2-3 मृतदेह. डॉ. सिसिलिया सिरील यांच्या शवविच्छेदन अहवालावरून राजीवजींची हत्या मानवी बॉम्बनेच झाली आहे असे सिद्ध झाले. पंजाबी ड्रेसवाल्या स्त्रीनेच तो आत्मघाती हल्ला घडवून आणला होता, आणि भारतीय इतिहासात पहिल्यांदा मानवी बॉम्बची नोंद झाली. त्यात RDX नावाच्या अतिशय स्फोटक रसायनाचा वापर केला होता. छर्रे वापरामुळे तो बॉम्ब अजूनच प्रभावी ठरला होता. त्याकाळी आशिया खंडात अशा प्रकारच्या हत्या करणारी एकच संघटना कार्तिकेयन यांच्या नजरेसमोर होती ती म्हणजे अर्थात LTTE. यापूर्वीही त्यांनी बरेच आत्मघाती हल्ले घडवून आणले होते, म्हणूनच संशयाची सुई आपसुकच त्यांच्याकडे वळली कार्तिकेयनने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवित तपास कार्य योग्य दिशेने सुरु ठेवले. वर्षभर गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारावर त्यांना 26 जण दोषी सापडले. कोर्टात 1044 साक्षीदारांची साक्ष झाली. 10 हजार पानांचे आरोप पत्र दाखल झाले. वरील सर्व हस्तगत पुराव्यांचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर हत्येचे गूढ हळूहळू उलगडत गेले ते असे की ---
                    श्रीलंकेत 2 भाषिक लोक राहतात, एक सिंहली तर भारतीय सीमेजवळील तमीळ. तमीळ मुळ निवासी की सिंहली यात मतभेद होते , पण तमीळ लोक संख्येने कमी होते एवढे मात्र निश्चित. इंग्रजांनी आपल्या राजवटीत दोन्ही प्रदेश एकछत्री अंमलाखाली आणले. सिंहली प्रदेश सुपिक होता. त्यात इंग्रजांनी चहाची लागवड सुरु केली. त्यांना मजूर मिळत नव्हते. त्यांची दृष्टी भारतीय तमीळ राज्यांवर पडली, त्यातून त्यांनी मजूर आयात केले. 
                    त्याचप्रमाणे तमीळ प्रदेश सुपिक नसल्यामुळे तेथील लोक ब्रिटीशांच्या सहाय्याने शिक्षणाकडे वळले. शिकून कुणी डॉक्टर, वकील, अधिकारी, अभियंते, व्यावसायिक झाले. ते हळूहळू सिंहली प्रांतांमध्ये पसरले. आता लंकेत तमीळींची संख्या निर्णायक झाली होती. सिंहलींना भविष्यातील धोका आता स्पष्ट दिसू लागला. दरम्यानच्या काळात आलेल्या सरकारने 2 तमीळ विरोधी कायदे मंजूर केले.
         1:-  तमिळींचे श्रीलंकन नागरिकत्व रद्द केले.
         2:-  त्यांना मतदानाला मज्जाव करण्यात आला.
 त्यावेळच्या पंतप्रधानांनी( जे की सिंहली होते ) तमीळ भागात लक्षणीय विकास केला, म्हणून सिंहली लोक तमीळ प्रदेशात स्थलांतरित झाले. तमीळवासीयांचा समतोल बिघडला. त्यांमध्ये आता चकमकी घडू लागल्या, तमीळ आपल्याच प्रदेशात अन्यायाला बळी पडू लागले. नंतर पंतप्रधानांनी हे कमी म्हणून की काय, बौद्ध धर्म हाच प्रमुख धर्म व सिंहली हीच लंकेची प्रमुख भाषा म्हणून घोषीत केली.त्यामुळे हिंसाचार बळावला.    त्यादरम्यान विविध दहशतवादी गट तमीळ राज्यांमध्ये जन्मास आले. 
                    त्यात 18 वर्षाच्या वेलुपिल्लई प्रभाकरन या तमीळ तरुणाने 1972 ला आपली संघटना स्थापन केली. लगेच त्याने एका मोठ्या राजकीय नेत्याची हत्या घडवून आणली. या घटनेमुळे त्याला अचानक महत्व प्राप्त झाले. त्याचे जाळे एवढे मजबूत होते की, सरकार त्याला जेरबंद करू शकली नाही. आता दाऊद जसा मोकाट आहे अगदी तसाच. या घटनेनंतर 1976 ला त्याने आपल्या संघटनेचे नामकरण LTTE (Liberation Tigers of Tamil Elem) अस केलं. संघटनेच ब्रीदवाक्य होतं,  "तमीळ मातृभुमीसाठी तहानलेले वाघ." या तमीळ दहशतवादी संघटनांमुळे बहुसंख्य सिंहली लोक अल्पसंख्यांक तमीळांवर अत्याचार करू लागले. त्यांनी तमीळींना निर्वासित केले. हेच निर्वासित लोक भारतात स्थलांतर करू लागले. भारतीय तमीळ पण त्यांचे आदरपूर्वक स्वागत करू लागले. 
                         या दहशतवादी संघटना मुख्य:  जगभर विखुरलेल्या तमीळ बांधवांवर आधारित होत्या. त्यांच्या कडून यांना पैसा, प्रसिद्धी आणि प्रचार मिळत होता. त्यांची साधनसामुग्री व सहानुभुती इतर दहशतवादी संघटनांमध्ये विभागली जाऊ नये अशी प्रभाकरनची इच्छा होती. म्हणून त्याने इतर तमीळ दहशतवादी संघटनांवर आक्रमण चालू केले. 1976 च्या अखेरपर्यंत LTTE हीच फक्त एक प्रमुख तमीळ दहशतवादी संघटना उरली. 
                     1987 ला राजीवजी पंतप्रधान असताना, श्रीलंकेत LTTE तमीळ नागरिकांसाठी स्वतंत्र प्रदेश मागत होती. त्यासाठी त्यांनी लढा चालू केला. ते फारच शिरजोर झाल्यामुळे लंकेने भारताला मदतीचा हात मागितला. राजीवजी आणि लंकेचे पंतप्रधान श्री. जयवर्धने यांमध्ये द्विपक्षीय करार झाला. त्यानुसार शांतीसेनेची स्थापना करण्यात आली. सेनेने बंडखोरांना बऱ्यापैकी जखडून ठेवले. त्यामुळे प्रभाकरनचा रोष सहाजिकच राजीव गांधीवर आला. राजीवजींना भीती होती की, लंकेने जर त्यांच्या मागण्या मान्य केल्या तर भारतीय तमीळ पण स्वतंत्र प्रदेशाची मागणी करतील आणि देशात अस्थिरता माजवतील. हाच शांतीसेना पाठवण्यामागचा नितळ उद्देश होता. पुढे राजीव गांधी निवडणूक हरल्यावर तत्कालीन सरकारने शांतीसेना परत बोलावली. पण ते सरकार 1991 ला पडले आणि मुदतपूर्व निवडणूकांचे वेध लागले. प्रचार करताना राजीव गांधी लंका भारत करारालाच समर्थन करत होते. प्रभाकरनला परत भीती वाटू लागली की, शांतीसेना पुन्हा लंकेत येऊन आपल्यावर अत्याचार करणार, म्हणून त्याने राजीव गांधी यांचाच काटा काढायचं ठरवलं. " न रहेगा बास न बजेगी बासुरी."
                    इंदिरा गांधींनी संसदेत भारताला एकसंघ लंका हवी आहे असे स्पष्टपणे सांगितले होते. यावरून भारताला लंकेची फाळणी नको होती हे स्पष्ट होते आणि फाळणी हेच तर LTTE चे उद्दिष्ट होते. भारताला तमीळ नागरिकांवर लंकेत होणारे अत्याचार मंजूर होते अशातला भाग नव्हता पण फाळणी हा त्यावरील उपाय नाही हे भारताचे मत होते. तर, फाळणीशिवाय हे अत्याचार थांबणार नाहीत हे LTTE चे. या फाळणीचा दुष्परिणाम भारतीय तमीळ जनतेवर पडला असता म्हणून भारताचा फाळणीला विरोध होता. 
                    श्रीलंका-भारत कराराआधी राजीव गांधी आणि प्रभाकरन मध्ये चर्चा झाली. तमीळ जनतेला न्याय देण्याचे आश्वासन राजीव गांधींनी प्रभाकरनला दिले. त्यानंतर द्विपक्षीय करार झाल्यामुळे राजीव गांधींनी आपला विश्वासघात केला असा आरोप LTTE नं केला. LTTE नं मग टोकाची भूमिका घेत हत्या घडवून आणली. धानू नावाच्या महिलेला मानवी बॉम्ब म्हणून निवडले गेले, हीच ती पंजाबी ड्रेस वाली स्त्री होय. श्रीलंकेतील निर्वासित वा त्यांचे नातेवाईक यांची साथ मिळाल्याशिवाय ही हत्या होणे शक्य नव्हते. म्हणून या हत्येसाठी भारतीय तमीळ जे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या सामील होते, तेही तेवढेच जबाबदार आहेत. 
                    भारतीय नागरिक जेव्हा देश व धर्म यांमध्ये एकाची निवड करण्याची वेळ येते तेव्हा धर्माची निवड करतो ,म्हणूनच आपल्यावर आजपर्यंत परकीय आक्रमण यशस्वीरीत्या झालेली आहेत. आता आयसीस हे नवं वादळ घोंघावतायं ,ते भारतीय मुस्लिम तरुणांना आकर्षित करताना दिसतयं, यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट ती काय म्हणावी. देश असहिष्णू झालाय असे काही जबाबदार व्यक्तींचे मत आहे. ती देश सोडून जाण्याची भाषा करताहेत. खरं तर अशा लोकांच्या बेजबाबदार वक्तव्यामुळेच देश असहिष्णू होतो हे त्यांच्या लक्षात येत नाही. 
                    आमिर जर तुला देश सोडण्याची इच्छा असेल तर खुशाल जा बाबा, कुणीही तुझ्या आड येणार नाही. पूर्ण खानदान घेऊन जा, अजून 2-4 ओळखीचे नेता आले तर बघ, भारतमातेचा भार हलका होईल. फक्त परदेशात उतरल्यावर, नाव सांगताच 2 तास कसून चौकशी झाल्यावर, " my name is khan & i am not a terrorist." अशी म्हणण्याची तुझ्यावर वेळ येवू नये म्हणजे झालं...

upcoming blog:- मी भूत पाहिलयं, तुम्ही ? 
टिप:- वरील सर्व छायाचित्र आंतरजाळावरून साभार

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पैठणी दिवस भाग-४ (अंतिम).

एके दिवशी सकाळीच अंघोळ उरकून सगळे तयार झाले. इथे येऊन पंधरवाडा उलटला तरी नाथांचे दर्शन घ्यायचा योग आला नव्हता. आज कसं सगळं मस्त जुळून आलं होतं. मंदिराबाबत बोलायचं तर संत एकनाथांच्या पूर्वीच्याच वाड्याचं रूपांतर मंदिरात केलंय. नाथांचे जन्मस्थान व समाधिस्थान पैठणच. सकाळीच गेल्यामुळे काहीही गर्दी नव्हती. आरामात दर्शन झाले. पण गर्दीची व्याख्या जर कोणाला पाहायची (ऐकायची नाही बरं का) असेल त्यांनी नाथषष्ठीला (साधारणतः मार्च महिना) पैठणला जरूर भेट द्यावी. त्या दिवशी अंदाजे 5-6 लाख भाविक पैठणमध्ये हजर असतात. त्या दिवसाला 'पंचपर्व' म्हणतात. त्या दिवशी 5 प्रमुख घटना क्रमाने घडल्या आहेत खालीलप्रमाणे:- 1. नाथांचे गुरू श्री जनार्धन स्वामी यांचा जन्म. 2. स्वामींना दत्तात्रयांचे दर्शन व अनुग्रह. 3. नाथांना स्वामींचे प्रथमदर्शन व अनुग्रह. 4. श्री जनार्दन स्वामी पुण्यतिथी. 5. श्री एकनाथ महाराज जलसमाधी. इतक्या साऱ्या गुरू-शिष्याच्या महत्वाच्या गोष्टी एकाच दिवशी घडाव्यात म्हणजे किती तो योगायोग.           आवारातच एक 12-13 वर्षाचा मुलगा 'सत्वर पाव गे मला l भवानी आई रोड...

पैठणी दिवस भाग-२

   .                ग्रामीण रुग्णालय पैठण येथे आम्हाला एक महिना सेवा द्यायची होती. राहण्यासाठी 2 खोल्या तेथेच उपलब्ध करून दिलेल्या होत्या. सामान टाकून, हात-पाय धुवून आम्ही जवळपास दुपारी 4 च्या दरम्यान डॉ.सचिन सरांकडे हजेरी लावली. आम्हाला महिन्याचे वेळापत्रक देण्यात आले. 2 जणांना सोबत महिनाभर काम करायचे होते. माझा सहकारी होता सुरज.             संध्याकाळी खुप उत्सुक होऊन धरणावर फिरावयास गेलो असता असे अप्रतिम दृश्य नजरेस पडले. कितीही पाहिले तरी मन भरत नव्हते. हा क्षण नजरकैद करण्यासाठी आपसुकच आमचे कॅमेरे बाहेर येऊन क्लीकक्लीकाट सुरू झाला. पाणी आणि आकाश इतके बेमालूमपणे एकमेकांत गुंफले होते की, त्यांना विभिन्न करणे केवळ अशक्य.              वेळापत्रकानुसार 2 जणांना अपघात विभागात 24 तास आपल्या कामावर हजर रहावे लागे. पैकी रात्री रुग्ण आला तर मामा (वर्ग 4 कर्मचारी) खोलीवर बोलावण्यास येई. उर्वरित सर्वांना बाह्यरुग्ण विभागात (ओ. पी. डी.) 2 वेळा जावे लागे. सकाळी 10-1 आणि दु...

दत्तू किटे

        .        23 जुलै 2017 वार रविवार, रविवारी रात्री आमच्या मेस(खानावळ) बंद असायच्या. नाईलाजाने (नाईलाजाने कसलं हो ! आम्ही तर चातकासारखी वाट बघायचो रविवारची) आम्ही बाहेर जेवायला जायचो. खिसे भरलेले असले की सतत बाहेर जेवायला जाता येत. पण घरचे बरोबर दुखती नस पकडत, महिन्यात येणाऱ्या 4 रविवारी बाहेर जेवता येईल इतकाच चंदा पाठवल्या जायचा. अधात मधात बाहेर जेवायला गेलं की मित्रांकडे उधारी व्हायची. कधीना कधी द्याव्या लागणाऱ्या उधारीमुळे पुढील सगळेच दिवस तंगीत जायचे. त्यापेक्षा फक्त रविवारीच जिभेचे चोचले पुरवले जायचे. तश्या आमच्या मेस ह्या अव्वल दर्जाच्या सहकारी(co-operative) मेस होत्या. आम्ही, आमच्यासाठी, आमच्या पोटाच्या कल्याणासाठी चालवलेली खानावळ म्हणजे ह्या सहकारी मेस(लोकशाहीच्या व्याख्येच्या सुरात वाचावे. याविषयी नंतर कधी तरी). तर आठवाड्यातले 6 दिवस अगदी घरच्यासारखं जेवल्यानंतर रविवारी जीव चटपटीत खायला अगदी असुसल्या जायचा. पाऊले आपोआप ढाब्याकडे वळायची. औरंगाबाद शहरापासून 14-15 कि.मी. अंतरावर दौलताबाद रोडवर डोंगरे मामांच्या 'साईकृपा' ढाब्यावर आमची ...