26 नोव्हेंबर 2008 , वार बुधवार , वेळ रात्री 11 वाजता महाराष्ट्राच्या जीवाच्या मुंबई वर आतंकवाद्यांनी भ्याड हल्ला केला.दुसऱ्या दिवशी आम्हाला दुपारी बातमी समजली, बाबा म्हणाले "काकांना फोन लाव रे!" काका तसे कल्याणला राहतात पण ऑफिस च्या निमित्ताने म्हणा, मुलांच्या शाळा म्हणा घरा बाहेर सतत ये-जा चालूच राहते.म्हणून काकांना सर्वकाही क्षेमकुशल आहे ना ! याची खात्री करून घेतली.मी बाबांना म्हणालो,सर्व जण सुखरूप आहेत .तेवढ्यात छोटी बहिण म्हणते कशी "दादा आपले काका सुखरूप आहेत पण जे हल्ल्यात जखमी वा मारले गेले ते पण कुणाचे तरी काका असतीलच ना!" तीचे शब्द सरळ काळजात रुतून पडले. खरंच ! जो पर्यंत आपले आप्तस्वकीय सुखरूप आहेत तो पर्यंत आपण कुठल्याही गोष्टीकडे गांभीर्याने बघत नाही. म्हणजे जोपर्यंत आपलं कुटुंब अशा संकटात सापडत नाही तोवर आपण अशा घटनांकडे कानाडोळा करायचा का ? असे हल्ले का होतात ? कोण करतं ? त्यांच उद्दिष्ट काय ? आतंकवादी म्हणजे नेमके कोण ? त्यांचे उगमस्थान कोणते ? त्यांच पालनपोषण कोण करतं ? असे प्रश्न आपल्याला पडायला हवेत.
आजच्या सर्व दहशतवादी संघटनेचे मुळ एका संघटनेच्या रुपात इजिप्त मध्ये जन्माला आलं.संघटनेच नाव होत ' मुस्लिम ब्रदरहुड ' या संघटनेचा संस्थापक हसन अल बन्ना हा होता .संघटनेचा मुळ उद्देश समाजकार्य करणे हाच होता . कालांतराने हसन बन्ना जमालुद्दीन नावाच्या कडव्या मुस्लीम धर्म प्रचारकाच्या सानिध्यात आला . हे सर्व सुन्नी मुसलमान होते . कालांतराने त्यांनी शिया व अन्य धर्मियांवर अत्याचार सुरु केले . मुस्लीम धर्मात दोन पंथ आहेत सुन्नी व शिया . सुन्नी म्हणजे मोहम्मद पैगंबर यांचे अनुयायी . शिया म्हणजे मोहम्मद पैगंबर चा जावई अली वा त्याची मुले हसन व हुसेन यांनी वाढवलेला पंथ . आजही सुन्नी लोक शिया लोकांना तुच्छ मानतात , त्यांचा छळ करतात . अशाप्रकारे समाजकार्यासाठी सुरु करण्यात आलेल्या संघटनेचे मुळ उद्देश बाजूला राहून त्यांचे पाऊल दहशतवादाकडे पडत गेले .
अरब देशात मोहम्मद बिन लादेन नावाचे फार श्रीमंत contractor होते . सौदी अरेबिया मधील प्रत्येक मस्जिद त्यांनी बांधली होती अगदी मक्का मदिनेतली सुद्धा . त्यांच्या स्वत:च्या कंपन्या सुद्धा होत्या . 2001 साली त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल तब्बल 25 कोटी डोलर्स आणि कर्मचारी संख्या 36000 . या महाशयांना तब्बल 54 मुलं होती . 10 बायकांपासून झालेली . छंदच जणू काही त्यांचा तो . एखाद्या batsman ची नाबाद धावसंख्या वाटावी एवढी तर मुलं होती त्यांना . सर्वात मोठा भाऊ ,सर्वात लहान भावाला ओळखत तरी असेल का ? काय माहीत . पण 17 नंबरच्या मुलाने मात्र आपला परिचय सर्व जगाला करून दिला . world trade centre पाडून , त्याचं नाव ओसामा बिन लादेन , नाम तो सुना ही होगा . पुढं ओसामानेही आपला वडीलोपार्जित छंद जोपासला, त्याला तब्बल 26 लेकरं झाली.
मधील काळात जागतिक महासत्ता असलेले देश दुर्बल देशांवर अधिसत्ता गाजवण्याची चढाओढ करत होते . अरबस्थानात अमेरिकेचा दबदबा होता . परंतू बाजूच्याच अफगाणीस्थानात रशिया होता. रशिया आणि अमेरिकेत पहिल्यापासूनच तेढ आहे . अफगाणीस्तानातले रशियाचे वर्चस्व पाहून अमेरिकेच्या डोळ्यात मिरकुट पडले . त्यांनी कोणत्याही हालतीत रशियाला अफगाणीस्थानातुन हद्दपार करण्याचे ठरवले . त्यावेळी जे अफगाण लोक रशियन सैन्याविरुद्ध लढत होते त्यांना अमेरिकेने आर्थिक व लष्करी साहित्य पुरवण्यास सुरुवात केली . अफगाण मध्ये एका टोळीचा म्होरक्या ओसामा सुद्धा होता . म्हणजेच ओसामाला सुद्धा अमेरिकेनेच पोसले . ओसामाची सर्व ताकद राशियाविरुद्ध होती . पण रशियाने अफगाणीस्थानातुन काढता पाय घेतल्यामुळे त्याने आपला मोर्चा इतर देशांकडे वळवला . मग आपल्याला प्रश्न पडतो की जर अमेरिकेनेच ओसामाला पोसले , तर मग ओसामा अमेरीकेच्या जीवावर का उठला ? तर त्याचे झाले असे की-
सद्दाम हुसेन इराकचे राष्ट्राध्यक्ष होते . त्यांनी कुवेतवर ताबा मिळवला . कुवेतच्या जवळ असलेल्या सौदी अरेबियाला आता सद्दाम हुसेन यांच्या आक्रमणाची भिती वाटू लागली . सौदीचे आणि अमेरिकेचे सौदार्हाचे संबंध होते . सौदीने लगेच अमेरिकेला मदतीचा हात मागितला. या भांडणामध्ये ओसामाचे म्हणणे होते की , सौदी आणि इराक दोन्ही सुन्नी राष्ट्र आहेत . आपण आपापसात वाद मिटवून घेवू . इस्लामिक पवित्र भूमीवर दूसऱ्या धर्माचे लष्कर उतरवण्यास ओसामाचा विरोध होता . पण अमेरिकेने ओसामाला न जुमानता सौदीला मदतीचे आश्वासन दिले . ओसामाला वाटायचे की कोणत्याही मुस्लीम राष्ट्रावर मुस्लिमोत्तर इतर धर्मियांचे वर्चस्व रहू नये .या ठिकाणी तर अमेरिकन आर्मी सरळ इस्लाम भूमीवर उतरणार होती . हा सरळ इस्लामचा अपमान आहे असे ओसामाला वाटायचे . अशाप्रकारे ओसामा आणि अमेरिकेतील संबंध कालांतराने बिघडतच गेले . मग जगाने ओसामाचे विध्वंसक रूप पाहिले , त्याने 11 सप्टेम्बर 2001 रोजी world trade center पाडले . अमेरिकेने पण जगाला आपली ताकद दाखवत 2 मे 2011 रोजी ओसामाला घरात घुसून मारले . या अचाट कामगिरीने सर्व जगाने अमेरिकेचे कौतुक केले . आता भारताला ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे . जर अमेरिका सातासमुद्रापलीकडून ओसामाला टीपू शकते तर आपण शेजारच्याच देशात लपून बसणाऱ्या दाऊदला का नाही पकडू शकत ? आजवर भारतीय समाज मनाची ही शोकांतिका राहिली आहे .
गेल्या दशकात भारत बऱ्यापैकी स्थिरावतोय पण मोठया घातपाताची शक्यताही नाकारता येत नाही . ही वादळापूर्वीची शांतता ठरू नये त्यासाठी हे वादळ शमवणे जरूरी आहे . त्यासाठी आपण आपले सैन्यदल , नाविकदल आणि वायुसेनेला अजुन बळकटी दिली पाहिजे . आपलं गुप्तहेर खातं अजुन सशक्त केलं पाहिजे . या देशाला सुजलाम - सुफलाम बनविण्यासाठी आपण सर्व भारतीय मिळून शपथ घेऊया की , मी भारत देशाचा सुजाण नागरिक असून , या देशाच्या प्रगतीसाठी ज्या ज्या गोष्टींची गरज पडेल ती ती देण्याची माझी तयारी आहे . माझे कुटुंब साक्षर असेल , त्याचा आकार लहान असेल . परकीय शक्तिंना (आतंकवाद) मी थारा देणार नाही . जुन्या रुढी , परंपरा टाकुन तंत्रज्ञानावर माझा भर राहिल . माझे राजकारण आणि समाजकारण सकारात्मक असेल . या सर्व गोष्टी जर आपण अंमलत आणल्या तर आपल्याला खऱ्या अर्थाने म्हणता येईल ' मेरा भारत महान ! ' आगामी काळात प्रवाहात जर टिकून राहण्याचे असेल तर वरील सर्व बाबींवर विचार करायलाच हवा कारण पुढले महायुद्ध शस्त्राने नाही तर विचार आणि तंत्रज्ञानाच्या बळावर लढले जाणार आहे ............
upcoming blog :- शोध राजीव हत्तेचा
टिप :- वरील सर्व माहिती गिरीष कुबेर यांच्या ' अधर्म युद्ध ' या पुस्तकातून वा internet वरून संकलित केली आहे.

Nice blog👍
ReplyDeletethanks amol
DeleteVery good article 👌
ReplyDeletethank you नी-३😊
ReplyDeleteClass article sir..:-)
ReplyDeletethank you aniket😀
ReplyDeleteGood one saurabh
ReplyDeleteThank u Anil☺
DeleteNice research n analysis...!!! Great article bro..keep it up...!!!
ReplyDeletethank you bhawa
ReplyDelete