Skip to main content

अंधार दहशतवादाचा.........!

                    26 नोव्हेंबर 2008 , वार बुधवार , वेळ रात्री 11 वाजता महाराष्ट्राच्या जीवाच्या मुंबई वर आतंकवाद्यांनी भ्याड हल्ला केला.दुसऱ्या दिवशी आम्हाला दुपारी बातमी समजली, बाबा म्हणाले "काकांना फोन लाव रे!" काका तसे कल्याणला राहतात पण ऑफिस च्या निमित्ताने म्हणा, मुलांच्या शाळा म्हणा घरा बाहेर सतत ये-जा चालूच राहते.म्हणून काकांना सर्वकाही क्षेमकुशल आहे ना ! याची खात्री करून घेतली.मी बाबांना म्हणालो,सर्व जण सुखरूप आहेत .तेवढ्यात छोटी बहिण म्हणते कशी "दादा आपले काका सुखरूप आहेत पण जे हल्ल्यात जखमी वा मारले गेले ते पण कुणाचे तरी काका असतीलच ना!" तीचे शब्द सरळ काळजात रुतून पडले. खरंच ! जो पर्यंत आपले आप्तस्वकीय सुखरूप आहेत तो पर्यंत आपण कुठल्याही गोष्टीकडे गांभीर्याने बघत नाही. म्हणजे जोपर्यंत आपलं कुटुंब अशा संकटात सापडत नाही तोवर आपण अशा घटनांकडे कानाडोळा करायचा का ? असे हल्ले का होतात ? कोण करतं ? त्यांच उद्दिष्ट काय ? आतंकवादी म्हणजे नेमके कोण ? त्यांचे उगमस्थान कोणते ? त्यांच पालनपोषण कोण करतं ? असे प्रश्न आपल्याला पडायला हवेत.
26/11 ताज हॉटेल, मुंबई हल्ला
                    आजच्या सर्व दहशतवादी संघटनेचे मुळ एका संघटनेच्या रुपात इजिप्त मध्ये जन्माला आलं.संघटनेच नाव होत ' मुस्लिम ब्रदरहुड ' या संघटनेचा संस्थापक हसन अल बन्ना हा होता .संघटनेचा मुळ उद्देश समाजकार्य करणे हाच होता . कालांतराने हसन बन्ना जमालुद्दीन नावाच्या कडव्या मुस्लीम धर्म प्रचारकाच्या सानिध्यात आला . हे सर्व सुन्नी मुसलमान होते . कालांतराने त्यांनी शिया व अन्य धर्मियांवर अत्याचार सुरु केले . मुस्लीम धर्मात दोन पंथ आहेत सुन्नी व शिया . सुन्नी म्हणजे मोहम्मद पैगंबर यांचे अनुयायी . शिया म्हणजे मोहम्मद पैगंबर चा जावई अली वा त्याची मुले हसन व हुसेन यांनी वाढवलेला पंथ . आजही सुन्नी लोक शिया लोकांना तुच्छ मानतात , त्यांचा छळ  करतात . अशाप्रकारे समाजकार्यासाठी सुरु करण्यात आलेल्या संघटनेचे मुळ उद्देश बाजूला राहून त्यांचे पाऊल दहशतवादाकडे पडत गेले . 
                    अरब देशात मोहम्मद बिन लादेन नावाचे फार श्रीमंत contractor होते . सौदी अरेबिया मधील प्रत्येक मस्जिद त्यांनी बांधली होती अगदी मक्का मदिनेतली सुद्धा . त्यांच्या स्वत:च्या कंपन्या सुद्धा होत्या . 2001 साली त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल तब्बल 25 कोटी डोलर्स आणि कर्मचारी संख्या 36000 . या महाशयांना तब्बल 54 मुलं होती . 10 बायकांपासून झालेली . छंदच जणू काही त्यांचा तो . एखाद्या batsman ची नाबाद धावसंख्या वाटावी एवढी तर मुलं होती त्यांना . सर्वात मोठा भाऊ ,सर्वात लहान भावाला ओळखत तरी असेल का ? काय माहीत . पण 17 नंबरच्या मुलाने मात्र आपला परिचय सर्व जगाला करून दिला . world trade centre पाडून , त्याचं नाव ओसामा बिन लादेन , नाम तो सुना ही होगा . पुढं ओसामानेही आपला वडीलोपार्जित छंद जोपासला, त्याला तब्बल 26 लेकरं झाली. 
                    मधील काळात जागतिक महासत्ता असलेले देश दुर्बल देशांवर अधिसत्ता गाजवण्याची चढाओढ करत होते . अरबस्थानात अमेरिकेचा दबदबा होता . परंतू बाजूच्याच अफगाणीस्थानात रशिया होता. रशिया आणि अमेरिकेत पहिल्यापासूनच तेढ आहे . अफगाणीस्तानातले रशियाचे वर्चस्व पाहून अमेरिकेच्या डोळ्यात मिरकुट पडले . त्यांनी कोणत्याही हालतीत रशियाला अफगाणीस्थानातुन हद्दपार करण्याचे ठरवले . त्यावेळी जे अफगाण लोक रशियन सैन्याविरुद्ध लढत होते त्यांना अमेरिकेने आर्थिक व लष्करी साहित्य पुरवण्यास सुरुवात केली . अफगाण मध्ये एका टोळीचा म्होरक्या ओसामा सुद्धा होता . म्हणजेच ओसामाला सुद्धा अमेरिकेनेच पोसले . ओसामाची सर्व ताकद राशियाविरुद्ध होती . पण रशियाने अफगाणीस्थानातुन काढता पाय घेतल्यामुळे त्याने आपला मोर्चा इतर देशांकडे वळवला . मग आपल्याला प्रश्न पडतो की जर अमेरिकेनेच ओसामाला पोसले , तर मग ओसामा अमेरीकेच्या जीवावर का उठला ? तर त्याचे झाले असे की-
                   सद्दाम हुसेन इराकचे राष्ट्राध्यक्ष होते . त्यांनी कुवेतवर ताबा मिळवला . कुवेतच्या जवळ असलेल्या सौदी अरेबियाला आता सद्दाम हुसेन यांच्या आक्रमणाची भिती वाटू लागली . सौदीचे आणि अमेरिकेचे सौदार्हाचे संबंध होते . सौदीने लगेच अमेरिकेला मदतीचा हात मागितला.  या भांडणामध्ये ओसामाचे म्हणणे होते की , सौदी आणि इराक दोन्ही सुन्नी राष्ट्र आहेत . आपण आपापसात वाद मिटवून घेवू . इस्लामिक पवित्र भूमीवर दूसऱ्या धर्माचे लष्कर उतरवण्यास ओसामाचा विरोध होता . पण अमेरिकेने ओसामाला न जुमानता सौदीला मदतीचे आश्वासन दिले . ओसामाला वाटायचे की कोणत्याही मुस्लीम राष्ट्रावर मुस्लिमोत्तर इतर धर्मियांचे वर्चस्व रहू नये .या ठिकाणी तर अमेरिकन आर्मी सरळ इस्लाम भूमीवर उतरणार होती . हा सरळ इस्लामचा अपमान आहे असे ओसामाला वाटायचे . अशाप्रकारे ओसामा आणि अमेरिकेतील संबंध कालांतराने बिघडतच गेले . मग जगाने ओसामाचे विध्वंसक रूप पाहिले , त्याने 11 सप्टेम्बर 2001 रोजी world trade center पाडले . अमेरिकेने पण जगाला आपली ताकद दाखवत 2 मे 2011 रोजी ओसामाला घरात घुसून मारले . या अचाट कामगिरीने सर्व जगाने अमेरिकेचे कौतुक केले . आता भारताला ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे . जर अमेरिका सातासमुद्रापलीकडून ओसामाला टीपू शकते तर आपण शेजारच्याच देशात लपून बसणाऱ्या दाऊदला का नाही पकडू शकत ? आजवर भारतीय समाज मनाची ही शोकांतिका राहिली आहे . 
                  गेल्या दशकात भारत बऱ्यापैकी स्थिरावतोय पण मोठया घातपाताची शक्यताही नाकारता येत नाही . ही वादळापूर्वीची शांतता ठरू नये त्यासाठी हे वादळ शमवणे जरूरी आहे . त्यासाठी आपण आपले सैन्यदल , नाविकदल आणि वायुसेनेला अजुन बळकटी दिली पाहिजे . आपलं गुप्तहेर खातं अजुन सशक्त केलं पाहिजे . या देशाला सुजलाम - सुफलाम बनविण्यासाठी आपण सर्व भारतीय मिळून शपथ घेऊया की , मी भारत देशाचा सुजाण नागरिक असून , या देशाच्या प्रगतीसाठी ज्या ज्या गोष्टींची गरज पडेल ती ती देण्याची माझी तयारी आहे . माझे कुटुंब साक्षर असेल , त्याचा आकार लहान असेल . परकीय शक्तिंना (आतंकवाद) मी थारा देणार नाही . जुन्या रुढी , परंपरा टाकुन तंत्रज्ञानावर माझा भर राहिल . माझे राजकारण आणि समाजकारण सकारात्मक असेल . या सर्व गोष्टी जर आपण अंमलत आणल्या तर आपल्याला खऱ्या अर्थाने म्हणता येईल ' मेरा भारत महान ! ' आगामी काळात प्रवाहात जर टिकून राहण्याचे असेल तर वरील सर्व बाबींवर विचार करायलाच हवा कारण पुढले महायुद्ध शस्त्राने नाही तर विचार आणि तंत्रज्ञानाच्या बळावर लढले जाणार आहे ............

upcoming blog :- शोध राजीव हत्तेचा

टिप :- वरील सर्व माहिती गिरीष कुबेर यांच्या ' अधर्म युद्ध '  या पुस्तकातून वा internet वरून संकलित केली आहे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पैठणी दिवस भाग-४ (अंतिम).

एके दिवशी सकाळीच अंघोळ उरकून सगळे तयार झाले. इथे येऊन पंधरवाडा उलटला तरी नाथांचे दर्शन घ्यायचा योग आला नव्हता. आज कसं सगळं मस्त जुळून आलं होतं. मंदिराबाबत बोलायचं तर संत एकनाथांच्या पूर्वीच्याच वाड्याचं रूपांतर मंदिरात केलंय. नाथांचे जन्मस्थान व समाधिस्थान पैठणच. सकाळीच गेल्यामुळे काहीही गर्दी नव्हती. आरामात दर्शन झाले. पण गर्दीची व्याख्या जर कोणाला पाहायची (ऐकायची नाही बरं का) असेल त्यांनी नाथषष्ठीला (साधारणतः मार्च महिना) पैठणला जरूर भेट द्यावी. त्या दिवशी अंदाजे 5-6 लाख भाविक पैठणमध्ये हजर असतात. त्या दिवसाला 'पंचपर्व' म्हणतात. त्या दिवशी 5 प्रमुख घटना क्रमाने घडल्या आहेत खालीलप्रमाणे:- 1. नाथांचे गुरू श्री जनार्धन स्वामी यांचा जन्म. 2. स्वामींना दत्तात्रयांचे दर्शन व अनुग्रह. 3. नाथांना स्वामींचे प्रथमदर्शन व अनुग्रह. 4. श्री जनार्दन स्वामी पुण्यतिथी. 5. श्री एकनाथ महाराज जलसमाधी. इतक्या साऱ्या गुरू-शिष्याच्या महत्वाच्या गोष्टी एकाच दिवशी घडाव्यात म्हणजे किती तो योगायोग.           आवारातच एक 12-13 वर्षाचा मुलगा 'सत्वर पाव गे मला l भवानी आई रोड...

पैठणी दिवस भाग-२

   .                ग्रामीण रुग्णालय पैठण येथे आम्हाला एक महिना सेवा द्यायची होती. राहण्यासाठी 2 खोल्या तेथेच उपलब्ध करून दिलेल्या होत्या. सामान टाकून, हात-पाय धुवून आम्ही जवळपास दुपारी 4 च्या दरम्यान डॉ.सचिन सरांकडे हजेरी लावली. आम्हाला महिन्याचे वेळापत्रक देण्यात आले. 2 जणांना सोबत महिनाभर काम करायचे होते. माझा सहकारी होता सुरज.             संध्याकाळी खुप उत्सुक होऊन धरणावर फिरावयास गेलो असता असे अप्रतिम दृश्य नजरेस पडले. कितीही पाहिले तरी मन भरत नव्हते. हा क्षण नजरकैद करण्यासाठी आपसुकच आमचे कॅमेरे बाहेर येऊन क्लीकक्लीकाट सुरू झाला. पाणी आणि आकाश इतके बेमालूमपणे एकमेकांत गुंफले होते की, त्यांना विभिन्न करणे केवळ अशक्य.              वेळापत्रकानुसार 2 जणांना अपघात विभागात 24 तास आपल्या कामावर हजर रहावे लागे. पैकी रात्री रुग्ण आला तर मामा (वर्ग 4 कर्मचारी) खोलीवर बोलावण्यास येई. उर्वरित सर्वांना बाह्यरुग्ण विभागात (ओ. पी. डी.) 2 वेळा जावे लागे. सकाळी 10-1 आणि दु...

दत्तू किटे

        .        23 जुलै 2017 वार रविवार, रविवारी रात्री आमच्या मेस(खानावळ) बंद असायच्या. नाईलाजाने (नाईलाजाने कसलं हो ! आम्ही तर चातकासारखी वाट बघायचो रविवारची) आम्ही बाहेर जेवायला जायचो. खिसे भरलेले असले की सतत बाहेर जेवायला जाता येत. पण घरचे बरोबर दुखती नस पकडत, महिन्यात येणाऱ्या 4 रविवारी बाहेर जेवता येईल इतकाच चंदा पाठवल्या जायचा. अधात मधात बाहेर जेवायला गेलं की मित्रांकडे उधारी व्हायची. कधीना कधी द्याव्या लागणाऱ्या उधारीमुळे पुढील सगळेच दिवस तंगीत जायचे. त्यापेक्षा फक्त रविवारीच जिभेचे चोचले पुरवले जायचे. तश्या आमच्या मेस ह्या अव्वल दर्जाच्या सहकारी(co-operative) मेस होत्या. आम्ही, आमच्यासाठी, आमच्या पोटाच्या कल्याणासाठी चालवलेली खानावळ म्हणजे ह्या सहकारी मेस(लोकशाहीच्या व्याख्येच्या सुरात वाचावे. याविषयी नंतर कधी तरी). तर आठवाड्यातले 6 दिवस अगदी घरच्यासारखं जेवल्यानंतर रविवारी जीव चटपटीत खायला अगदी असुसल्या जायचा. पाऊले आपोआप ढाब्याकडे वळायची. औरंगाबाद शहरापासून 14-15 कि.मी. अंतरावर दौलताबाद रोडवर डोंगरे मामांच्या 'साईकृपा' ढाब्यावर आमची ...