दरवर्षीप्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावी न जाता माझ्या मुळ गावी 'साखळी', जिथे माझे काका- काकू, आजी- आजोबा राहतात तेथे गेलो. मामाच्या घरी का नाही गेलो? याचे उत्तर काही माझ्या जवळ नाही पण, मागल्या वर्षी काकांनी मला 'साखळी'ला बोलवल्यावर काकू म्हणाली, "तो कसला येतोय? मामाला दोन मुली असल्यावर." झालं काकुंनी असा टोमणा मारला म्हटल्यावर कोण जातयं हो मामाच्या घरी. मग ठरवलं की, यावर्षी उन्हाळा काकांच्याच घरी. . काकांच्या घरासमोरच माझा बालसवंगडी राहायचा. त्याचे नाव महेश पण, लाडाने आम्ही सगळे मित्रगण त्याला 'म्हश्या' म्हणायचो. त्याच्या सोबत गप्पा मारताना जुन्या आठव...
विद्यैव बलम्