Skip to main content

Posts

जैविक व रासायनिक ब्रम्हास्त्रे भाग-१.

       .             ऑगस्ट 1906 साल अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्य. ऑईस्टर बे या नासाऊ प्रांतातील शहरात एका आलिशान घरात एक मुलगी आजारी होती. त्या काळात अमेरिका आता इतकी जरी पुढारलेली, प्रगत, आत्ममग्न नसली तरी त्या मुलीच्या आजारपणाशी बाकीच्यांचा संबंध येण्याचे वा इतका गवगवा होण्याचं काही एक कारण नव्हतं. ज्या घरात ती आजारी होती ते घर नेहमी पर्यटकांसाठी भाड्याने दिल्या जात असे. अश्याच पर्यटकांपैकी ती सुद्धा तिच्या परिवारासमवेत येथे सुट्ट्यांचा आनंद लुटायला आली होती. घर प्रशस्त आणि समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे कोणत्याही पर्यटकास चटकन पसंत पडे. पण ऐनवेळी आजारी पडल्यामुळे सगळा खेळखंडोबा झाला होता. इतर सदस्य तिची सर्वतोपरी काळजी घेत होते. पण तरी तिचा ताप काही केल्या उतरेना. लक्षण टायफॉईडची (विषमज्वर)असल्याचे बोलले जात होते. कारण इतरत्र टायफॉईडचे रुग्ण आढळले होते. वर्तमानपत्रातही टायफॉईडच्याच बातम्या येत होत्या. साथच असावी बहुदा. म्हणून रोगाच्या निदानाची घरातल्या लोकांनाच चटकन कल्पना आली. पण दुर्दैवाने घरातील इतरही 6 सदस्य लवकर आजारी पडले. अगदी त्याच लक्षणांसहित. आता मात्र बाब गंभीर होती. घरातील

दत्तू किटे

        .        23 जुलै 2017 वार रविवार, रविवारी रात्री आमच्या मेस(खानावळ) बंद असायच्या. नाईलाजाने (नाईलाजाने कसलं हो ! आम्ही तर चातकासारखी वाट बघायचो रविवारची) आम्ही बाहेर जेवायला जायचो. खिसे भरलेले असले की सतत बाहेर जेवायला जाता येत. पण घरचे बरोबर दुखती नस पकडत, महिन्यात येणाऱ्या 4 रविवारी बाहेर जेवता येईल इतकाच चंदा पाठवल्या जायचा. अधात मधात बाहेर जेवायला गेलं की मित्रांकडे उधारी व्हायची. कधीना कधी द्याव्या लागणाऱ्या उधारीमुळे पुढील सगळेच दिवस तंगीत जायचे. त्यापेक्षा फक्त रविवारीच जिभेचे चोचले पुरवले जायचे. तश्या आमच्या मेस ह्या अव्वल दर्जाच्या सहकारी(co-operative) मेस होत्या. आम्ही, आमच्यासाठी, आमच्या पोटाच्या कल्याणासाठी चालवलेली खानावळ म्हणजे ह्या सहकारी मेस(लोकशाहीच्या व्याख्येच्या सुरात वाचावे. याविषयी नंतर कधी तरी). तर आठवाड्यातले 6 दिवस अगदी घरच्यासारखं जेवल्यानंतर रविवारी जीव चटपटीत खायला अगदी असुसल्या जायचा. पाऊले आपोआप ढाब्याकडे वळायची. औरंगाबाद शहरापासून 14-15 कि.मी. अंतरावर दौलताबाद रोडवर डोंगरे मामांच्या 'साईकृपा' ढाब्यावर आमची मैफिल रंगायची. नेहमीचे सदस्य म्

पैठणी दिवस भाग-४ (अंतिम).

एके दिवशी सकाळीच अंघोळ उरकून सगळे तयार झाले. इथे येऊन पंधरवाडा उलटला तरी नाथांचे दर्शन घ्यायचा योग आला नव्हता. आज कसं सगळं मस्त जुळून आलं होतं. मंदिराबाबत बोलायचं तर संत एकनाथांच्या पूर्वीच्याच वाड्याचं रूपांतर मंदिरात केलंय. नाथांचे जन्मस्थान व समाधिस्थान पैठणच. सकाळीच गेल्यामुळे काहीही गर्दी नव्हती. आरामात दर्शन झाले. पण गर्दीची व्याख्या जर कोणाला पाहायची (ऐकायची नाही बरं का) असेल त्यांनी नाथषष्ठीला (साधारणतः मार्च महिना) पैठणला जरूर भेट द्यावी. त्या दिवशी अंदाजे 5-6 लाख भाविक पैठणमध्ये हजर असतात. त्या दिवसाला 'पंचपर्व' म्हणतात. त्या दिवशी 5 प्रमुख घटना क्रमाने घडल्या आहेत खालीलप्रमाणे:- 1. नाथांचे गुरू श्री जनार्धन स्वामी यांचा जन्म. 2. स्वामींना दत्तात्रयांचे दर्शन व अनुग्रह. 3. नाथांना स्वामींचे प्रथमदर्शन व अनुग्रह. 4. श्री जनार्दन स्वामी पुण्यतिथी. 5. श्री एकनाथ महाराज जलसमाधी. इतक्या साऱ्या गुरू-शिष्याच्या महत्वाच्या गोष्टी एकाच दिवशी घडाव्यात म्हणजे किती तो योगायोग.           आवारातच एक 12-13 वर्षाचा मुलगा 'सत्वर पाव गे मला l भवानी आई रोडगा वाहिन तुला ll&

पैठणी दिवस भाग-३

.   बाह्यरुग्ण विभागामध्ये मलमपट्टी विभागात काम करायला मला विशेष आवडत असे. रुग्णांची संख्या कमी असल्यामुळे त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारता येत असत. 'जखम कशी झाली' या विषयाद्वारे रुग्ण आपलं मन माझ्यापाशी मोकळं करत. त्यांच्याकडून मग मी पैठण शहराची माहिती, प्रेक्षणीय स्थळे, खाऊ गल्ली यांची माहिती अलगद काढून घेत असे.                                          असेच एके दिवशी मध्यम वयाचे गृहस्थ आपल्या वडिलांना घेऊन मलमपट्टी विभागात आले. दोघेही एकमेकांवर मारवाडी भाषेत ओरडत आले. वडील मुलाला म्हणत होते, 'मला नाही करायची पट्टी बिट्टी'. त्यांचा मुलगा पण त्यांना प्रतिउत्तर देत होता. आत आल्यानंतर मात्र ते शांत झाले. त्यांना पायाला मोठी जखम (ulcer) झालेली होती. ती खूप खूप दिवसांपासून बरी होत नव्हती. अर्थात काळजी घेण्यात दिरंगाई होत होती. जखम भरत नाही म्हणजे आहार पण निकृष्टच असावा. जखमेचा भाग काळसर पडत चालला होता. त्यात भरपूर घाण साठली होती. त्यांची जखम व्यवस्थित साफ करून मलमपट्टी केली. पण खरा इलाज अजून बाकीच होता (सुसंवाद). बाप लेकामध्ये सुसंवाद नाही हे लक्षात आले होते. आजोबा चिड

पैठणी दिवस भाग-२

   .                ग्रामीण रुग्णालय पैठण येथे आम्हाला एक महिना सेवा द्यायची होती. राहण्यासाठी 2 खोल्या तेथेच उपलब्ध करून दिलेल्या होत्या. सामान टाकून, हात-पाय धुवून आम्ही जवळपास दुपारी 4 च्या दरम्यान डॉ.सचिन सरांकडे हजेरी लावली. आम्हाला महिन्याचे वेळापत्रक देण्यात आले. 2 जणांना सोबत महिनाभर काम करायचे होते. माझा सहकारी होता सुरज.             संध्याकाळी खुप उत्सुक होऊन धरणावर फिरावयास गेलो असता असे अप्रतिम दृश्य नजरेस पडले. कितीही पाहिले तरी मन भरत नव्हते. हा क्षण नजरकैद करण्यासाठी आपसुकच आमचे कॅमेरे बाहेर येऊन क्लीकक्लीकाट सुरू झाला. पाणी आणि आकाश इतके बेमालूमपणे एकमेकांत गुंफले होते की, त्यांना विभिन्न करणे केवळ अशक्य.              वेळापत्रकानुसार 2 जणांना अपघात विभागात 24 तास आपल्या कामावर हजर रहावे लागे. पैकी रात्री रुग्ण आला तर मामा (वर्ग 4 कर्मचारी) खोलीवर बोलावण्यास येई. उर्वरित सर्वांना बाह्यरुग्ण विभागात (ओ. पी. डी.) 2 वेळा जावे लागे. सकाळी 10-1 आणि दुपारी 2-4 हे कामाचे तास सोडले तर इतरवेळी तुम्ही काहीही करू शकत होतात. कामाच्या वेळी सुद्धा आम्ही बरीच दिरंगाई केली